खलाणे शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण करीत गुलाब पुष्प देऊन पेढे भरवत नवागतांचे स्वागत

0
28

प्रतिनिधी।धुळे शिंदखेडा तालुक्यातील खलाणे जिल्हा परिषद शाळेने सालाबाद प्रमाणे यावर्षीही नवागतांचे स्वागत गुलाब पुष्प देत पेढे भरवीत स्वागत केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची घोड्यावरून पारंपारिक वाद्य वल्हर व संबळसह वाजत गाजत गावभर मिरवणूक काढण्यात आली.. याप्रसंगी गल्लीतील गावातील सर्व नागरिक मिरवणुकीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत होते. अत्यंत रम्य वातावरणात संगीतमय शैक्षणिक गीतांसह व शैक्षणिक घोषणांसह ही मिरवणूक पार पडली.
शाळेच्या प्रवेशद्वारावर सर्व नवागतांचे वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करीत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांना गुलाब पुष्प देत पेढे भरवीत शाळेच्या प्रथम दिनी स्वागत केले…
पहिले पाऊल
या उपक्रमा अंतर्गत इयत्ता पहिलीच्या नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ए फोर साईज पेपर वर पावलाचे ठसे उमटवून पालकांना प्रदान करण्यात आले या गोष्टीची पालकांमध्ये फार उत्सुकता निर्माण झाली काही पालकांनी हे पावलाचे ठसे लगेचच लॅमिनेशन करून शिक्षकांना मोठ्या आपुलकीने दाखविले.
पायरीवर नतमस्तक-
याप्रसंगी काही विद्यार्थी प्रवेशद्वारावर पायऱ्यांवर नतमस्तक होत शाळेत प्रवेश केला
यानंतर इयत्ता पहिलीच्या वर्ग प्रवेश समारंभ प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व मान्यवरांनी नवागत विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापित त्यांना वर्ग प्रवेश दिला.
वर्गात शिरताच विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रसन्न वातावरण पाहून मुले हर्षल लासित झाले वर्ग शिक्षकांनी पहिलीचा वर्ग अत्यंत बोलका सचित्र व फुगे पताका रांगोळ्या यांनी भरगच्च सजवलेला होता.
याप्रसंगी वर्गशिक्षक श्री राकेश पाटील विद्या जाधव व मान्यवरांनी इयत्ता पहिलीच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना कडेवर घेत त्यांना भरपूर चॉकलेट देत त्यांचे कौतुक केले व शाळेतील शैक्षणिक साहित्य चित्र फुगे यांच्यासोबत विद्यार्थ्यांमध्ये रमले. हे चित्र अत्यंत देखणीय असे होते पहिल्याच दिवशी विद्यार्थी व शिक्षक एकमेकांमध्ये रमल्याचे चित्र दिसले. हे चित्र पाहून नवागत बालकांचे पालक यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य व समाधान दिसून आले.
आपल्या पाल्याला आपण योग्य शाळेत दाखल केल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते
व्यासपीठ
-आजच्या शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भुरेसिंग गिरासे उपाध्यक्ष एम.डी पाटील गावचे सरपंच रत्नाताई भिल संगीताताई वाल्हे ,ज्ञानेश्वर भामरे, कमलेश अहिरराव. ओंकार ईशी. ज्ञानेश्वर मोरे प्रदीप देसले योगेश पाटील सर्व मान्यवर शिक्षक पालक व शासनाकडून नियुक्त आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक गिरीश अंबर महाले विशेष शिक्षक बीआरसी शिंदखेडा व्यासपीठावर विराजमान झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भुरेसिंग गिरासे हे होते प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव यांनी शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थित त्यांना दिली व आगामी काळातील उपक्रम व विद्यार्थी लाभार्थी योजना यांबाबत पालकांना ज्ञात केले.
शैक्षणिक साहित्य वाटप
शासन निर्देशानुसार शाळेच्या प्रथम दिनी शासनाकडून प्राप्त शालेय गणवेश शालेय पाठ्यपुस्तके बूट व मोजे तसेच समाजाच्या सहभागातून. त्यात भीमराव शिरसाट .भुरेसिंग गिरासे .कमलेश अहिरराव. ज्ञानेश्वर भामरे या मान्यवरांनी प्रत्येक वर्गासाठी लेखन साहित्य त्यात वही पेन पेन्सिल खोडरबर इत्यादी भरगच्च साहित्याचे देणगी म्हणून दिले ते मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला वाटप करण्यात आले.
एक पेड मा के नाम..
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांकडून आपल्या शाळा प्रवेशाच्या दिनी आईसाठी एक वृक्ष लावले व त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. यातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग प्रेम व नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती निर्माण झाली.
निष्ठांना भोजन
शाळेच्या प्रथम देणे सर्व विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान पोषण शक्ती योजनेअंतर्गत गोड पदार्थ म्हणून जिलेबी चे निष्ठांना भोजन देण्यात आले सर्व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना भरभरून जिलेबी खाऊ घातली.. व मान्यवरांनीही भोजनाचा आस्वाद घेतला व समाधान व्यक्त केले.
सभा.
मुख्याध्यापकांनी त्यांच्या दालनात सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावीत शाळा व्यवस्थापन समिती महिला तक्रार निवारण समिती सखी सावित्री समिती व विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची पुनर स्थापना करून त्याची सभा घेण्यात आली व आजच्या दिवशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली समितीचे कार्यरचना सर्व पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितले सर्वांना मान्यवरांनी शाळेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
परिश्रम
आजच्या या खलाणे येथील शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव उपशिक्षक राकेश पाटील विद्या जाधव जयश्री गीते प्रिया सांगळे प्राजक्ता बोरसे ज्ञानेश्वर तवर मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी रोहन गिरासे बाळू गिरासे बेबीताई देसले सविता ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.
वरील सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे ज्येष्ठ शिक्षक प्रवीण कुमार सोनवणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here