
धुळे- धुळे तालुक्यातील सांजोरी येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश,बुट पायमोजे, पाठ्यपुस्तके, दप्तर, तसेच गुलाबपुष्प आणि फुगे देऊन पंचायत समितीचे आपत्ती अभियंता जयदीप तेलवेकर यांच्या हस्ते सरपंच गणेश गवळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय पाटील उपाध्यक्ष किशोर पाटील, सदस्य दिलीप ठाकरे सुरेश माळी, रविंद्र गवळी,आदी पदाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले त्याअगोदर थार या चारचाकी आणि इतर दोन चारचाकी वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाजतगाजत गावात मिरवणूक काढण्यात आली, यावेळी शालेय पोषण आहारासोबत विद्यार्थ्यांना जिलेबी,पाववडा, कचोरी आदी मिष्टान्न भोजन देण्यात आले,अतिशय उत्साहात साजरा झालेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक भुपेश वाघ, उपशिक्षक रत्नमाला पवार विवेक चव्हाण युवा प्रशिक्षक विनोद घुगे यांनी परिश्रम घेतले.