सौंदाणे येथील खुनाच्या प्रयत्नांच्या केस मधील आरोपी चा जामीन अर्ज फेटाळल
प्रतिनिधी।धुळे
संपूर्ण तालुक्याला हादरवून सोडणाऱ्या सौदाणे येथील हाप मर्डर केस मधील आरोपीचा नियमित जामीन अर्ज मे जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या मुळे आरोपीचा जेल मधील मुक्काम वाढला आहे.
तालुक्यातील सौदाणे गावात दि.11 एप्रिल रोजी झोपेत प्रकाश ज्ञानेश्वर पाटील याच्यावर धारदार हत्याराने जीवेठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात जीभाऊ उर्फ नितीन ज्ञानेश्वर पाटील याच्या विरुद्ध बीएनएस चे कलम 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ला अटक करण्यात आली आहे.या घटनेतील जखमी प्रकाश उपचार नंतर घरी गेला असला तरी त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.या घटनेतील आरोपी च्या नियमित जामीन साठी मे.जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला. त्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायाधिश मे.एस.आर.भदगले यांच्या समोर झाले.सरकार पक्षाच्या वतीने ऍड.देवेंद्र तवर यांनी कामकाज पाहिले.तर जामीन अर्जाच्या कामकाजात सरकार पक्षाला मदतीसाठी मूळ फिर्यादी च्या वतीने ऍड.अमोल भी.पाटील यांनी मूळ फिर्यादी ची बाजू मांडली. परिस्थिती जन्य पुरावे,जखमींची स्थिती वकिलांचा प्रभावी युक्तिवादा मुळे मे.जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज रद्द करण्याचा आदेश दिला.या मुळे आता आरोपी ची कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
