प्रतिनिधी।धुळे
औरंगाबाद एनसीसी ग्रुपचे कमांडर ब्रिगेडियर ए.जी. बरबरे यांनी एस एस व्ही पी महाविद्यालय, येथे भेट दिली. त्यांना कॅडेडसने गार्ड ऑफ ऑनर दिला. त्याच्या हस्ते छात्र सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
ब्रिगेडियर बरबरे यापूर्वी राष्ट्रीय छात्र सेना मुख्यालय, जबलपूर येथे ग्रुप कमांडर म्हणून कार्यरत होते, नुकतीच त्यांची बदली औरंगाबाद ग्रुप कमांडर म्हणून झाली. 297 मीडियम रेजिमेंट च्या माध्यमातून कमिशन प्राप्त केले होते. 10 आर्टिलरी ब्रिगेड चे कमांडर म्हणून देखील कार्यरत होते.
ब्रिगेडियर बरबरे यांनी सर्व एनसीसी कॅडेट्सना शिस्त, नेतृत्वगुण, आणि राष्ट्रीय सेवेसाठी प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले. त्यांनी एनसीसीमधील संधी, शिस्त आणि सामाजिक योगदानावर भर दिला. प्राचार्य आणि व्यवस्थापन सदस्यांसोबत ब्रिगेडियर बरबरे यांनी एनसीसीच्या कार्यपद्धती, कॅडेट्सच्या प्रगतीसाठी आवश्यक सुविधा, आणि भविष्यातील उपक्रमांबद्दल सखोल चर्चा केली.
कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅडेट्सना ब्रिगेडियर बरबरे यांच्या हस्ते बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. यामुळे कॅडेट्समध्ये अभिमान आणि पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळाले. यात प्रामुख्याने ज्युनियर अंडर ऑफिसर दर्शन गर्दे – राष्ट्रीय ओशो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी निवड.
कॅडेट सुदर्शन पाटील – ज्यांनी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले. 

ज्युनियर अंडर ऑफिसर यशवर्धन करंगळे – ज्यांनी ऑल इंडिया आर्मी कॅम्प, दिल्ली येथे मॅप रीडिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
ज्युनियर अंडर ऑफिसर हिमांशू पाटील – प्रजासत्ताक दिन परेड २०२५ साठी निवड.
फ्लाइंग ऑफिसर मोनिराज माळी – ज्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी भारतीय हवाई दलात सामील होऊन धुळे शहराचे नाव लौकिक केले.
या भेटीमुळे महाविद्यालयातील एनसीसी युनिटला नवी दिशा, कॅडेट्सना प्रेरणा, आणि व्यवस्थापनाला एनसीसीच्या उपक्रमांसाठी अधिक सहकार्याची ग्वाही मिळाली आहे.
ब्रिगेडियर ए.जी. बरबरे यांच्या भेटीच्या कार्यक्रमात अनेक मान्यवर अधिकारी आणि महाविद्यालयातील प्रमुख व्यक्तींची उपस्थिती होती.
प्रमुख उपस्थित मान्यवर कर्नल शैलेंद्र जी गुप्ता (बटालियनचे कमांडिंग ऑफिसर) त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचा सहभाग दिला. कर्नल सुदीप मिश्रा (प्रशासकीय अधिकारी) यांनी कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात सक्रिय भूमिका बजावली. डॉ. एम. व्ही. पाटील (महाविद्यालयाचे प्राचार्य) आणि डॉ. रवींद्र वाघ (प्राचार्य)
यांनी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत व सहकार्य केले. महाविद्यालयाचे छात्र सेना अधिकारी मेजर के. एम. बोरसे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय प्रभावीपणे केले. कॅप्टन के. जी. बोरसे यांनी ब्रिगेडियर बरबरे यांचा औपचारिक सत्कार केला. मेजर महेंद्रकुमार वाढे आणि कॅप्टन क्रांती पाटील, कॅप्टन शशिकांत खलाणे, कॅप्टन सुनील पाटील, कॅप्टन पंकज देवरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या सर्व मान्यवरांच्या सहकार्यामुळे आणि योगदानामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला. त्यांच्या उपस्थितीमुळे कॅडेट्सना आणि उपस्थितांना मोठ्या प्रमाणावर प्रेरणा मिळाली.