हातनूरला माजी विद्यार्थ्यांची 12 वर्षानी भरली शाळा,जुन्या आठवणींना दिला उजाळा

0
29

प्रतिनिधी।धुळे
माध्यमिक विद्यालय साळवे हातनूर हे साळवे फाटा येथील विद्यालयातील माजी विद्यार्थी मेळावा नुकताच पार पडला,या वेळी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

या  विद्यालयात साळवे आणि हातनूर या दोघी गावांचे विद्यार्थी शिक्षण घेतात. ह्याच शाळेतील 2012-13 ला असलेली 10 वी च्या बॅच कडून रविवारी 22 जून रोजी वर्गमित्रांनी स्नेह भेट कार्यक्रमाचे आयोजन केले. आपल्या शाळे प्रति असलेले प्रेम, मित्रा बदल चा जिव्हाळा, आपुलकी च नात्याला आणि बालपणीच्या आयुष्यातील आठवणीना उजाळा देण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आणि कार्यक्रम यशस्वी केला.विद्यार्थ्यांनमध्ये
काही गृहिणी, शेतकरी,आर्मी, इंजीनियर, मेडिकल फिल्ड, एनजीओ, काही शिक्षण क्षेत्रात तर काही उत्तम उद्योजक अश्या विविध पदांवर व क्षेत्रात आपले आणि आपल्या शाळेचा नावलौकिक करणारे सर्व विद्यार्थी ह्या कार्यक्रमात उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान हे शाळेचे माजी मा.मुख्याध्यापक डी. एस वाघ हे होते.या वेळी मुख्याध्यापक पी. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले.  तसेच  नगराळे, गिरासे, डी व्ही पाटील, पी डी पाटील, सूर्यवंशी , बाविस्कर, जाधव यांनी  मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हे मोहन नगराळे यांनी केले. ह्या स्नेहसंमेलन मध्ये एका दिवसाची शाळा भरवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले. स्नेह भेट सम्मेलन ही संकल्पना सत्यात आणण्यासाठी वैभव भारती यांनी मेहनत घेतली आणि सर्व शिक्षकांच्या कृतार्थ सत्कारासाठी कुमुदिनी पाटील यांनी आपल्या कडून सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना भेटवस्तू दिल्या. आनि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षकांना यथोचित सन्मान दिला आणि कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेत बालपणीच्या आठवणी आणि शाळेचे जीवन अनुभवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here