प्रतिनिधी। धुळे
संपूर्ण महाराष्ट्र व गोव्यात वकिलांच्या हितासाठी झटणारे, ज्युनिअर व सिनिअर वकिलांचे खंबीर मार्गदर्शक आणि धुळे जिल्हा वकील संघाचे सन्माननीय सदस्य असलेले ॲड. अमोल सावंत यांची महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल धुळे जिल्हा वकील संघाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
धुळे जिल्हा वकील संघाच्या हॉल मध्ये पार पडला. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या न्यायिक अधिकाऱ्यांचाही पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या अध्यक्षतेखाली झाला.या वेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ, संघाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांच्यासह जिल्ह्यातील विविध वकिल बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home ताज्या बातम्या ॲड. अमोलदादा सावंत यांची महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड...