राजद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याचा माजी आमदार शहाचा अर्ज हायकोर्टाने फेटाळला

0
45

प्रतिनिधी । धुळे
शहराचे माजी आमदार फारुख शहा यांच्या विरुध्द चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात जुन २०२३ मध्ये राजद्रोह,धार्मिक भावना भडकावणे,दोन धर्मात तेढ निर्माण करणे अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे.दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी माजी आमदार शहा यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल अर्ज हायकोर्टाने फेटाळत जोरदार चपराक दिली आहे.

माजी आमदार फारुख शहा यांनी चाळीसगाव रोड परिसरात एका चौकात बेकायदेशीर बांधकाम करुन त्या चौकाला टिपु सुलतान असे नाव दिले.त्या विरुध्द भाजयुमो कार्यकर्ते रोहित चांदोडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन माजी आमदार फारुख शहा यांच्या विरुध्द चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भादवी कलम १५३ अ, १९५ अ,५०४,५०६,१२४ अ,१२० ब,४०४,३४ तसेच महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेन्समेंट प्रॉपर्टी अॅक्ट च्या कलम ३ व ४ प्रमाणे १९ जुन २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल असलेली फिर्याद रद्द करण्यासाठी माजी आमदार फारुख शहा यांनी उच्च न्यायालय औंरगाबाद खंडपिठात अर्ज दाखल केला.या अर्जावर न्यायमुर्ती विभा कनकनवाडी, न्यायमुर्ती संजय देशमुख, यांच्या समोर काम चालले.शहा यांच्या वकीलांनी हायकोर्टात बाजु मांडतांना सांगीतले की, टिपु सुलतान हे स्वातंत्र्य सैनिक होते.त्यांचे नाव चौकाला देणे हा गुन्हा होत नाही.तसेच आमदार निधीतुन सदरचे काम करतांना शासनाची परवानगी घेतल्याचा बचाव केला. या प्रकरणी रोहित चांदोडे यांच्या वतीने अॅड.चेतन चौधरी यांनी जोरकस बाजु मांडली.फारुख शहा यांच्या वकीलांनी मांडलेले मुद्दे खोडून काढले.तसेच वस्तुनिष्ठ मुद्दे मांडून विश्लेषणात्मक युक्तीवाद केला.तसेच अद्याप पर्यंत चौकशी पुर्ण झालेली नाही,आमदारांना उपलब्ध असलेला निधी ते बांधकाम करण्यासाठी वापरला गेला काय हा प्रश्न आहे.तसेच कोणत्याही चौक,रस्ता,सार्वजनिक जागेचे नाव आमदार स्वत: देवु शकत नाहीत.त्यासाठी महापालीकेच्या सभेत ठराव करणे आवश्यक आहे.हे सर्व मुद्दे अॅड.चौधरी यांनी आपल्या युक्तीवादात मांडले.बचाव पक्षाने सादर केलेले पुरावे,अॅड.चौधरी यांचा प्रभावी युक्तीवाद विचारात घेऊन उच्च न्यायालयाने माजी आमदार शहा यांनी फिर्याद रद्द करण्यासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळून लावत जोरदार चपराक दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here