मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतुन बालकावर उपचार

0
30

प्रतिनिधी।धुळे

धुळे शहरातील निरामय हॉस्पिटल,  येथे खंडालय ता. जि. धुळे येथील चि. शिव योगेश पाटील, वय ३ वर्ष, यास उजव्या बाजूला जन्मतः हर्निया असल्यामुळे शस्त्रक्रियेची गरज होती. परंतु आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्या कारणाने शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नव्हता. अशा परिस्थितीत निरामय हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ माधुरी बोरसे यांनी  शिवच्या पालकांना मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतून मदत होण्यासाठीचे मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश पाटील व  प्रमोद बागुल यांनी तत्काळ प्रकरण तयार करून मंजुरीस पाठविले. अवघ्या ५ दिवसातच प्रकरण मंजूर होऊन शिव यांच्यावर उपचार सुरु झाले. सदर प्रकरणी मुख्यमंत्री सहायता निधीचे राज्याचे कक्ष प्रमुख श्री रामेश्वर भाऊ नाईक यांनी मोलाचे सहकार्य केले.
महाराष्ट्राचे लाडके नेते, राज्याचे मुखमंत्री  देवेन्द्र फडणवीस  यांच्या अखत्यारीत असलेले मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे, येथील हे पहिलेच मंजूर प्रकरण असून, जिल्हयातील गरजू रुग्णांनी संपर्क साधून जास्तीत जास्त ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन निरामय हॉस्पिटल येथील कॅन्सर सर्जन डॉ माधुरी बोरसे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here