प्रतिनिधी। धुळे
धुळे तहसील कार्यालयामार्फत नुकतेच काही प्राथमिक शिक्षकांना मतदार केंद्र स्तरीय अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत.परंतु सध्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू असून लवकरच बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत आणि सध्या देण्यात आलेले बरेचशे मतदार केंद्रस्तरीय अधिकारी हे बदली पात्र आहेत त्यामुळे त्या शिक्षकांना आजच्या मुळ आस्थापनेवरील आदेश काही दिवसांत बदली झाल्याने रद्द करावा लागेल.म्हणून त्यापेक्षा बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मतदार केंद्रस्तरीय अधिकार्यांची नेमणूक करण्यात यावी तसेच आता देण्यात आलेल्या मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये काही शिक्षकांची समायोजनाने बदली झाल्याने त्यांची शाळेची गावं बदलली आहेत तसेच काही शिक्षक दिव्यांग आहेत अशा बदली झालेल्या व दिव्यांग शिक्षकांना मतदार केंद्रस्तरीय अधिकार्यांची आदेश रद्द करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन निवासी नायब तहसीलदार संजय पवार यांना देण्यात आले.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भुपेश वाघ सरचिटणीस ऋषिकेश कापडे कार्याध्यक्ष प्रशांत महाले आदी पदाधिकारी उपस्थित होते.