पुजा बागुल खुन प्रकरणात जामीन अर्ज फेटाळला आरोपींचा वाढला जेल मधील मुक्काम

0
34

प्रतिनिधी । धुळे
शहरातील वक्रतुंड विहार नगरात वास्तव्यास असलेल्या मयत पुजा बागुल हिला विषारी औषध टोचुन निघृनपणे खुन करण्यात आला.या घटनेतील आरोपी तथा पुजा बागुलचे सासु आणि सासऱ्यांचा नियमीत जामीन अर्ज मे.जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.यामुळे आता संबधीतांचा जेल मधील मुक्काम वाढला आहे.
संपुर्ण शहरासह जिल्ह्याला हादरवणारी घटना जुन महिन्यात घडली. अवैध सबंधात अडचण ठरणारी पत्नीला दुर सारण्यासाठी पती व त्याच्या नातेवाईकांनी मिळुन मयत पुजा बागुल या विवाहिला विषारी औषधाचे इंजेक्शन टोचुन तिची निघृणपणे हत्या केली.या प्रकरणी पश्चिम देवपुर पोलीस ठाण्यात पतीसह दहा जणांच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असुन सध्या आरोपी कारागृहात आहेत.या घटनेतील आरोपी क्र.२ व ३ तथा मयत पुजा बागुलचे सासु आणि सासरे यांचा नियमीत जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला.त्याचे कामकाज मे.जिल्हा व सत्र न्यायाधिश यास्मीन देशमुख यांच्या कोर्टात चालले. सरकार पक्षाच्या वतीने अॅड.एन.बी.कलाल यांनी बाजु मांडत आरोपीच्या जामीन अर्जावर हरकत घेतली. हि घटना समाजावर दुर्गामी परिणाम करणारी असल्याने सामाजीक भावनेतुन सरकार पक्षाला मदत म्हणुन मुळ फिर्यादीच्या वतीने अॅड.अमित दुसाणे यांनी वकीलपत्र दाखल करत मयत पुजा बागुल हिच्या न्यायासाठी न्यायालयात जोरकस बाजु मांडली.जर आरोपींना जामीन मंजुर करण्यात आला.तर आरोपी हे पुरावे नष्ट करतील.तसेच आरोपी फरार होण्याची देखील शक्यता वर्तवली.हि घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने आरोपीचा जामीन अर्ज नामंजुर करण्याची मागणी केली.त्यांना अॅड.प्रियंका विभांडीक, अॅड. अमोल पाटील यांनी मदत केली. सरकार पक्षाच्या वतीने केलेला युक्तीवाद तसेच मुळ फिर्यादीच्या वतीने केलेला युक्तीवाद,मयताचा शवविच्छेदन अहवाल आदि मुद्यांची दखल घेत. जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी आरोपीचा जामीन अर्ज रद्द केला आहे.यामुळे आता आरोपींचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे. या घटनेत सामाजीक भावनेतुन मयताला न्याय मिळवुन देण्यासाठी अॅड.अमीत दुसाणे यांनी बाजु मांडल्याने माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्यासह विविध महिला संघटनांच्या वतीने अॅड.दुसाणे यांचा सन्मान देखील करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here