प्रतिनिधी।धुळे
तृतीय पंथीय देखील मनुष्य आहेत.त्यांना देखील व्यापार व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे.ही बाब विचारात घेऊन धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये प्रेरणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे म्हशी चा व्यापार करण्यासाठी सुरवात करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती यशवंतर दामू खैरनार व उपसभापती नानासाहेब देवराम पाटील यांनी मार्गदर्शन करीत तृतीयपंथी यांना संविधानातील जगण्याचा हक्क समजावीत स्वतःच्या पायावर उभे राहत दुधाचा तसेच म्हशींचा व्यापार करण्याचा नवीन उद्योग चालू करण्या करिता जगण्याचा एक नवीन आधार व आशेचा नवीन किरण देत त्यांना तृतीयपंथीयांची हक्काचा उद्योग निर्वाह साठी जागा उपलब्ध करून दिली. तसेच म्हशींचा व्यापार व दुग्ध व्यवसाय करून स्वावलंबी कसे बनता येईल व स्वतःच्या पायावर उभे राहात आपण स्त्री पुरुषांप्रमाणेच तृतीयपंथी यांनी सुद्धा व्यवसाय करून आपला स्वतःचा उदरनिर्वाह करावा अशी आशा बाळगली व त्यावेळी तेथे संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच कम्युनिटी मेंबर उपस्थित होते. पार्वती परशुराम जोगी, नीलू पार्वती जोगी, स्वरा पार्वती जोगी,अलका पार्वती जोगी, साक्षी जोगी, शुभांगी जोगी, विशाखा जोगी, जानवी जोगी, जानवी जोगी, प्रशांत चोळके, रोहित चौधरी, प्रवीण शेटे सागर शिंदे आदी उपस्थित होते.