प्रतिनिधी।धुळे
प्रेरणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तर्फे GLODP कोरो इंडिया सहयोगाने तृतीयपंथी हक्काची समिती व आमचे प्रश्न आमचे नेतृत्व या ब्रीद वाक्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. अध्यक्षस्थानी अहिल्यानगर येथील दिशा शेख होत्या.
कार्यक्रमाला समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे व धुळे महानगरपालिका क्षेत्रातील संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार हंसराज पाटील, प्रशांत अहिरे, सचिन चोरडिया, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग येथील सचिन शेवतकर, धुळे जिल्हा रुग्णालय येथील आयसीटीसी समुपदेशक नरेंद्र देवरे, धुळे महानगरपालिका शाळा क्रमांक 9 इंग्रजी माध्यम येथील मुख्याध्यापिका छायाताई करनकाळ तसेच प्रेरणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सचिव नीलू पार्वती जोगी, अलका जोगी, साक्षी जोगी, विशाखा जोगी, शुभांगी जोगी, किरण जोगी, वर्षा जोगी, चांदणी जोगी, जानवी जोगी, रोहिणी जोगी, सोनाली मोरे, प्रवीण शेटे, सागर शिंदे, भागवत वाघ, मोहन पाटील, ओम माने, उमेश् वरसाळे आदि उपस्थित होते.