जिल्हा व सत्र न्यायालयात जागतिक योग दिवस साजरा

0
10

प्रतिनिधी।धुळे

जागतिक योग दिनानिमित्त धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात आयोजित या कार्यक्रमात जिल्हा व सत्र न्यायाधीश  माधुरी आनंद यांनी सर्वांना निरोगी जीवनासाठी योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना न्यायाधीश माधुरी आनंद यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे महत्त्व अधोरेखित केले. प्राचीन काळापासून योगाचे महत्त्व अबाधित असून, न्यायालयीन कामकाज हे कर्मचारी, प्रशासन आणि संबंधित सर्वांसाठीच तणावपूर्ण असते. अशा परिस्थितीत, रोजच्या जीवनात योगाचा नियमित अंगीकार केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यात निश्चितपणे सकारात्मकता येते, असे मत त्यांनी व्यक्त केले.या योग शिबिरात धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष मधुकर भिसे, धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुलकर्णी, तसेच न्यायाधीश, वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध आसनाचे अध्ययन

योग गुरु राजू सोनवणे व प्रशांत जाधव मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थितांनी ओमकार व प्रार्थना, व्यायाम, योगासने यात ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, बैठक स्थितीतील आसने यात भ्रदासन, बद्धकोनासन, बटरफ्लाय, वज्रासन, उत्तान मंडूकासन, वज्रासन भुजंगासन, शलभासन, मकारासन, सेतुबंधासन, उत्तानपादासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, प्राणायमात नाडीशोधन प्राणायाम, शितली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ध्यान व ओमकार योगासने आणि प्राणायाम केलेत. याशिवाय धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योगासन सत्राचे आयोजन करण्यात आले होते पांजरा नदी किनारी, एस आर पी ग्राउंड तसेच उद्यानात देखील योग सत्राचे आयोजन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here