प्रतिनिधी।धुळे
जिल्हा परिषद शाळा खलाणे येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग संगम कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले.कार्यक्रम उत्साहात पार पडला.
आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार रजिस्ट्रेशन करून खलाणे शाळेने योग्य संगम कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भुरेसिंग गिरासे उपाध्यक्ष एम.डी वाघ . प्रमोद पाटील प्रदीप देसले ज्ञानेश्वर मोरे गणेश येशी.तसेच इतर सदस्य पालक वर्ग व शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव राकेश पाटील विद्या जाधव ज्ञानेश्वर पवार प्रिया सांगळे जयश्री गीते प्रवीण कुमार सोनवणे व जयश्री गीते रोहन गिरासे या.शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून मुक्त हालचाली बैठे कवायत ताडासन वृक्षासन चक्रासन अर्ध चक्रासन पद्मासन तसेच प्राणायाम यात कपालभाती भ्रमरी पत्रिका विलोम अनुलोम इत्यादी कृतींचा समावेश करीत प्रात्यक्षिक घेतले याप्रसंगी शाळेचे योगशिक्षक प्रवीण कुमार सोनवणे व जयश्री गीते यांनी विद्यार्थ्यांकडून योग्य प्रकारे प्रात्यक्षिके करून घेतले. विद्यार्थ्यांनी सर्व प्रात्यक्षिके मोठ्या उत्सुकतेने व आवडीने केलेत. प्रात्यक्षिके केल्यानंतर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांच्या असते शेंगदाणा चिक्कीचे वाटप पूरक आहार म्हणून करण्यात आली.
मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक योग साधना प्राणायाम यांचे काय महत्त्व असते याचे मार्गदर्शन केले. शाळेत दर दुसऱ्या व चौथ्या शनिवारी योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक घेतले जातात व पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सामूहिक कवायत घेतली जाते यातून विद्यार्थ्यांना अनुशासन शिस्त व सैनिकी शिक्षणाचे महत्त्व पटविले जाते.