प्रतिनिधी।धुळे
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयच्यावतीने सोमवार, 23 जून रोजी ‘ऑलिम्पिक डे’ निमित्ताने विविध खेळांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी दिली आहे.
जागतिक ऑलिम्पिक समितीच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून सोमवारी विविध प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातबास्केटबॉल खेळ प्रशिक्षण वर्ग – सकाळी 7.00 वाजता,रायफल शूटिंग खेळ प्रशिक्षण खेळ – सकाळी 10.00 वाजता,बॅडमिंटन खेळ प्रशिक्षण वर्ग – संध्याकाळी 4.00 वाजता,योगासन प्रशिक्षण वर्ग– संध्याकाळी 6.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे. तर खो-खो खेळ प्रशिक्षण वर्ग – संध्याकाळी 6.00 वाजता गरुड मैदान, येथे आयोजित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी व क्रीडाप्रेमींनी या प्रशिक्षण वर्गांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.टिळे यांनी केले आहे.