प्रतिनिधी।धुळे देशात आणीबाणी लागू झालेल्या घटनेस आज 50 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आणीबाणीत कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्यासह अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, नायब तहसीलदार श्रीकांत देसले, यांच्यासह आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्ती, त्यांचे कुटूंबिय आणि वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणी जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्यासह मान्यवरांनी केली.उपजिल्हाधिकारी खेडकर यांनी प्रास्ताविक केले त्यांनी सांगितले की आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेस आज 50 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा व त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात येत आहे. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी तर आभार जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी मानले.
प्रदर्शनीला प्रतीसाद
यावेळी केंद्र शासनामार्फत आणीबाणीवर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. याठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देशात सन 1975 ते 1977 मध्ये लावलेल्या आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. हे प्रदर्शन उद्यापासून माहिती व जनसंपर्क भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे नागरीकांना बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.जिल्हा माहिती कार्यालयामार्फत भरविण्यात आलेल्या प्रदर्शनास सन्मानार्थ्यांनी भेट देवून प्रदर्शनाबाबत कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील संदीप गावित, बंडू चौरे, चैतन्य मोरे, इस्माईल मनियार, ऋषिकेश येवले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.मदनलाल जमनालाल मिश्रा, भिमसिंग रायसिंग राजपूत, माधव जनार्दन बापट, मधुसूदन उर्फे विजय शांताराम पाच्छापुरकर, यादवराव शामराव पाटील (प्रतिनिधी), प्रकाश त्र्यंबक कुलकर्णी, गोपालदास जमनालाल मिश्रा (प्रतिनिधी ), हरसिंग गोरखसिंग जमादार (गिरासे), शशिकांत रनाळकर (प्रतिनिधी), रविंद्र बेलपाठक, रेणुका बेलपाठक, शेखर वसंत चंद्रात्रे (प्रतिनिधी), भास्कर बापट, प्रभाकर भावसार, डॉ.भुपेंद्र शहा, शीला सत्यानारायण अग्रवाल, मंजुळाबाई श्रीपत पाटील, मालती नवनीतलाल शाह, पुष्पा सुभाष शर्मा, प्रविण कृष्णदास शहा, श्रीराम पुरुषोत्तम कुलकर्णी, शशिकला सोमनाथ जोशी (प्रतिनिधी), प्रकाश त्र्यंबक मराठे, शशीकला देविदास शार्दुल, रविंद्र वामन सोनवणे, भिकुबाई शामराव मराठे, डोंगर कन्हैया बागुल, शकुंतलाबाई जूगलकिशोर अग्रवाल यांचा जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्या हस्ते सन्मानपत्र, गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला.