आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा होणार सन्मान

0
30

प्रतिनिधी।धुळे

1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत धुळे जिल्ह्यातील ज्या व्यक्तींना कारावास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा बुधवार, 25 जून, 2025 रोजी सातपुडा भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे दुपारी 12.00 वाजता सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार यांनी दिली आहे.

देशात सन 1975 ते 1977 मध्ये लागलेल्या आणीबाणी कालावधीत लढा देताना धुळे जिल्ह्यातील व्यक्तींनी मिसा व आयआर अंतर्गत सामाजिक व राजनैतिक कारणासाठी कारावास भोगलेला आहे. या व्यक्तींना मुख्यमंत्रीच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देवून गौरव, 25 जून, रोजी सातपुडा भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी  भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here